एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : अवैध लाकडाची वाहतूक करणारे वाहन जप्त
Major action by MIDC police : Vehicle transporting illegal wood seized जळगाव : लिंबाच्या लाकडाची अवैधरीत्या छोट्या हत्ती वाहनातून वाहतून करताना चालकाला एमआयडीसी पोलिसांनी बुधवार, 8 रोजी सायंकाळी 5.30 वाजता नेरीनाका पांचाळ गल्लीसमोर रस्त्यावर ताब्यात घेतले.
चारचाकी (एम.एच. 15 डी.के.0356) या क्रमांकाच्या वाहनात लाकडे भरून चालक सैय्यद मुस्तकीन सैय्यद मुनाफ (25, लाकडी वखार, शिवाजीनगर) हा लाकडाची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.


पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी,योगेश बारी, सिध्देश्वर डापकर, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी ही कारवाई केली. चालक व वाहन पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.