वळणावर घसरली दुचाकी अन् गाठले मृत्यूने : देव्हारीत शोककळा


Two-wheeler fell on the curve and met with death : Mourning in Dewar जळगाव : वळणावर नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने देव्हारीतील तरुणाचा मृत्यू झाला तर मित्र गंभीर जखमी झाल्याची जळगाव तालुक्यातील उमाळे फाट्याजवळ शुक्रवार, 10 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशाल राजेंद्र सपकाळे (21, देव्हारी, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

नियंत्रण सुटल्याने घसरली दुाचाकी
विशाल राजेंद्र सपकाळे (21) हा तरुण आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह जळगाव तालुक्यातील देव्हारी येथे वास्तव्याला आहे. तो एमआयडीसीतील सिद्धार्थ केमिकल कंपनीत वेल्डरमधून कामाला होता. शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी विशाल सपकाळे हा त्याचा मित्र विशाल गुळवे यांच्यासोबत दुचाकी (एम.एच.19-5613) ने कंपनीतून देव्हारी येथे घरी जाण्यासाठी निघाले असता जळगाव तालुक्यातील उमाळे फाट्याजवळील वळणावर त्यांची दुचाकी स्लिप झाली. यातील विशाल सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागी मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला विशाल गुळवे हा गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली. मयत विशाल सपकाळेच्या पश्चात वडील राजेंद्र गोविंदा सपकाळे, आई मीराबाई मोठा भाऊ निखील व विवाहित बहिण असा परिवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !