पूर्व वादातून पाळधीत दोन गटात तुंबळ हाणामारी : 10 जण जखमी


Clash between two groups due to previous dispute : 10 people injured पाळधी : पूर्व वादातून पाळधीत दोन गटात झालेल्या हाणामारीत दहाहून अधिक जण जखमी झाले. या घटनेने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

पूर्व वैमनस्याचा वाद उफाळला
पाळधी बुद्रुक येथील कोळी वाड्यात शुक्रवारी रात्री साळुंखे व सपकाळे या दोन गटात पूर्वीच्या वादातून वाद वाढल्यानंतर दोन्ही गट समोरा-समोर भिडले. लाठया-काठया, दगड व शस्त्राचा वापर झाल्याने 10 हून अधिक जण जखमी झाले. जखमींवर पाळधी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. काहींना प्रथम उपचार नंतर घरी सोडून देण्यात आले तर काहींना जळगावातील खासगी रुग्णालयात व जीएमसीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाळधी येथे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आऊट पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीतील जुन्या वादातून शुक्रवारी पुन्हा वाद उदभवून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !