जळगावात दुकानाची भिंत फोडत 60 हजारांचा मुद्देमाल लांबवला
In Jalgaon, by breaking the wall of a shop ; goods worth 60,000 were stolen जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र सुरून असून शहरातील दाणा बाजार येथील दुकानाची भिंत फोडून चोरट्याने 40 हजारांच्या रोकडसह 20 हजारांचा व मसाले असा एकूण 60 हजारांचा माल लांबवाल. हा प्रकार शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता समोर आला. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद दुकान फुटल्याने व्यापारी धास्तावले
हरीचंद्र कन्हैयालाल ललवाणी (54, रा.गणेशनगर) यांचे दाणाबाजारात सतगुरु ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दिवाळी सणामुळे दुकानात सुका मेव्यासह इतर माल भरलेला आहे. गुरुवार, 9 नोव्हेंबर रोजी रात्री ललवाणी हे दुकान बंद करून घरी गेले. शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या दुकानाच्या भिंतीला छित्र पाडल्याचे लक्षात आले. दुकानात पाहणी केली असता दुकानातील 40 हजार रुपयांची रोकड, 20 हजार रुपये किंमतीचा सुकामेवा, मसाले अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी ललवाणी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार बशीर तडवी करीत आहेत.

