किनगाव-डांभूर्णी रस्त्यावर भीषण अपघात : ट्रकच्या धडकेने डिकसाईतील प्रौढ ठार
Fatal accident on Kingaon-Dambhurni road : Adult from Diksai killed in collision with truck यावल : दिवाळीची खरेदी करून घराकडे निघालेल्या डिकसाईतील 48 वर्षीय इसमाचा अपघाती मृत्यू झाला. ही अपघात किनगाव डांभूर्णी रस्त्यावर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. यावल तालुक्यातील किनगाव येथून दिवाळीचा बाजार करून दुचाकीद्वारे डिकसाई येथील 48 वर्षीय प्रौढ डांभूर्णीमार्गे डिकसाईकडे निघाले होते. भरधाव वेगात येणार्या ट्रकच्या धडकेत तो जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला.
दिवाळी बाजार आटोपताच गाठले मृत्यूने
किनगाव, ता.यावल येथून शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेला दिवाळीचा बाजार खरेदी करून निंबा चव्हाण (48, डिकसाई, ता.जळगाव) यांनी किनगाव येथून संपूर्ण दिवाळीचा बाजार केला व दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.पी.2196) द्वारे डांभूर्णीकडे जात असतांना पाटचारीजवळ मंगेश कोळी यांच्या शेताच्या समोर डांभुर्णीकडून किनगावकडे भरधाव वेगाने येणार्या ट्रक क्रमांक (आर.जे.11 जी.बी. 7696) वरील चालकाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात निंबा चव्हाण हे जागीच ठार झाले.


रात्री उशिरा यावल पोलिसात गुन्हा
अपघाताची माहिती कळताच किनगावचे रवींद्र कोळी यांनी डांभूर्णी पोलिस पाटील किरण कचरे, किनगावचे सचिन नायदे यांना माहिती देत पोलिसांना कळवले. पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार जाकीर तडवी, भूषण चव्हाण यांनी धाव घेतली व रवींद्र कोळी, राजेंद्र कोळी, स्वप्निल लोहार आदींच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.