आधी वृद्धेला दिली धडक नंतर 45 हजारांची रोकड लांबवली : जळगावातील दाणा बाजारातील घटना
First the old woman was hit, then the cash of 45,000 was extended : the incident in the grain market in Jalgaon जळगाव : अनोळखी महिलेने वृद्धेला धडक देत हातचलाखी करीत 45 हजारांची रोकड लांबवली. ही घटना शनिवारी दुपारी नवीपेठेतील दाणा बाजार परीसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील बळीराम पेठेत गीताबाई श्रावण चौधरी ही वृद्धा वास्तव्यास आहे. शनिवार, 11 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गीताबाई या त्यांच्याकडे असलेल्या कामवाली बाई रंजना प्रजापत यांच्यासोबत नवीपेठतील दाणाबाजार परिसरात दिवाळीचा बाजार करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्याकडे असलेली 45 हजारांची रोकड कापडाच्या पिशवीत ठेवून ती पिशवी खांद्याला अडकवलेली. किराणा सामान घेण्यासाठी त्या दुकानात जात असतांना त्यांना एका अनोळखी महिलेने मागून धक्का दिला. यावेळी त्या महिलेने हातचालाखी करीत वृद्धेच्या खांद्याला असलेल्या पिशवीतून रोकड लांबवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

