जळगावात दोन लाखांची केबल चोरीला
A cable worth two lakhs was stolen in Jalgaon जळगाव : बांधकाम सुरू असलेल्या साईटच्या इमारतीच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी सुमारे 2 लाख 2 हजार 320 रुपयांच्या किमतीचे दोन केबल बंडल चोरुन नेले. रामदास कॉलनी परिसरात शुक्रवार 10 रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी शनिवार 11 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा मोर्चा बांधकाम साईटवर
रामदास कॉलनी परीसरात एका इमारतीचे निर्मितीचे बांधकाम प्रगतीवर आहे. या इमारतीत असलेल्या एका प्लॅटच्या रुममध्ये साहित्य ठेवण्यात येते. तसेच रुम कुलूपबंद केला जातो. चोरट्यांनी या इमारतीत प्रवेश करत प्लँटच्या दरवाजाचे कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रुममधील सुमारे एक लाख 17 हजार 228 किमतीची 6 एम.एम.काँपर वायर एकूण 12 बंडल किंमत रुपये नऊ हजार 769 तसेच 84 हजार 660 किंमतीचे प्रत्येकी चार हजार 233 किंमतीची 2.5 एम.एम.कॉपर वायर 20 बंडल असा माल लांबविला.


घटना कळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत तसेच रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी. याप्रकरणी इंजिनीअर लोकेश किशोर मोरे (28, रा.गणेशनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.
जळगाव : कापडी पिशवीत पैसे ठेवून फुले मार्केटमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकर्याजवळील सुमारे 4 हजार 500 रुपयांची रोकड चोरट्याने चोरुन नेली. शुक्रवार 10 ूरोजी दुपारी 1 वाजता फुले मार्केट परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी सुवर्णसिंग भरतसिंग राजपुत (51) रा. गणेश कॉलनी या शेतकर्याने तक्रार दिल्यावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोहेकॉ राजकूमार चव्हाण हे करीत आहेत.