कावपिंप्रीतील दोन वर्षीय बालकाचा शौचालयाच्या टाकीत पडल्याने मृत्यू
A two-year-old boy in Kawpimpri died after falling into the toilet tank अमळनेर : महिनाभरापूर्वीच पितृछत्र हरपलेल्या अमळनेर तालुक्यातील कावपिंप्रीतील दोन वर्षीय चिमुकल्याचा शौचालयाच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. भूषण दिलीप सोनवणे (2, कावपिंप्री, ता.अमळनेर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.
शौचालयाच्या टाकीत बुडाल्याने मृत्यू
अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी शौचालयासाठी लागणार्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. ही टाकी पूर्णपणे पाण्याने भरलेली असून भूषण सोनवणे याचा शौचालयाच्या टाकीत पडून बुडून मृत्यू झाला. हा बाब त्याचे आजोबा लिलाधर गोविंदा सोनवणे यांना शौचालयाच्या टाकीत चिमुकला भूषण हा टाकीत मयतावस्थेत तरंगतांना दिसून आला. त्याला बाहेर काढून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय पाटील करीत आहे.


महिन्याभरापुर्वीच वडीलांचे निधन
मयत मुलगा भूषण याचे वडील दिलीप लिलाधर सोनवणे यांचे 17 ऑक्टोबर रोजी दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यातच आता दिपावलीच्या दिवशी चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून सोनवणे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.