दुचाकी घसरल्याने देव्हारीतील तरुणाचा मृत्यू
जळगाव : वळणावर दुचाकी स्लिप होवून अपघातात एका विशाल राजेंद्र सपकाळे (21, देव्हारी) या तरुणाचा मृत्यू तर विशाल गुळवे जखमी झाला.त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहे.
शुक्रवार, 10 रोजी उमाळे फाट्याजवळ ही घटना घडली. विशाल हा एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

