18 टन अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त
A truck carrying 18 tonnes of illegal timber seized सोयगाव : सोयगाव-बनोटी रस्त्यावर दिवसभर परीसरातून अवैध लाकुडतोडीचा ट्रक सतर्क ग्रामस्थांनी पकडत वनविभागाच्या स्वाधीन केला. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास रामपुरा शिवारात घडली. सोयगाव वनविभागाच्या हद्दीत विना परवाना अवैध लाकूड तोडीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे याकडे सोयगाव वनपरीक्षेत्र विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे..
ग्रामस्थांची सतर्कता
जरंडी, निंबायती,रामपुरा बहुलखेडा या परिसरातील सोमवारी दिवसभर अवैध लाकुडतोड करून तोड केलेली लाकडे रात्रीच्या वेळी एकाच ठिकाणी संकलित करून ट्रक (एम.एच.41 जी.7283) ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून वनविभागाच्या स्वाधीन केला. ही घटना रात्री दहा वाजता घडला. वेताळवाडी पूर्वचे वनरक्षक गणेश नागरगोजे यांना पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या ट्रक मध्ये अठरा टन महारुख वृक्षाची लाकडे असल्याचे वनविभागाच्या पथकांनी सांगितले.


घटनास्थळी रात्रभर वनमजूर संतोष चव्हाण, प्रवीण झाकटे, सुरेश पवार, राजू राठोड, नंदू राठोड, त्र्यंबक भोटकर आदींना ट्रक जवळ रात्रीचे कर्तव्य निभावत होते. जप्त ट्रक ही अजिंठ्याचा असून व्यापार्याचे नाव मात्र समोर आलेले नाही.