जळगावातील तरुण शिक्षकाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू


Jalgaon student dies after falling from train जळगाव : शहरातील रूस्तमजी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील 22 वर्षीय तरूण शिक्षकाचा रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. जळगाव ते शिरसोली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने हा प्रकार घडला. विजय शाम सोनी (22, रा. बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश, ह.मु.जळगाव) असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

परतीच्या प्रवासात गाठले मृत्यूने
विजय शाम सोनी हे जळगावातील रूस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. ते मूळ रहिवाशी मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर येथील रहिवाशी आहेत. दरम्यान दिवाळीनिमित्त ते कल्याण येथील मामांकडे भेटण्यासाठी गेले होते. कल्याणहून परत ते मुळगावी बर्‍हाणपुर येथे जाण्यासाठी बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी रेल्वेने प्रवास करीत असताना जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वे खंबा क्रमांक 407 जवळ धावत्या रेल्वेतून पडले. त्यात सचिन सोनी हे गंभीर जखमी झाले.



ही घटना घडल्यानंतर जळगाव रेल्वे पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सचिन भावसार यांनी घटनास्थळी धाव घेवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !