शेळगावातील वयोवृद्धाचा धरणात बुडून मृत्यू

0

An elderly man in Shelgaon drowned in the dam जळगाव : तोल जावून धरणात पडल्याने शेळगावातील वयोवृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रमेश दामू कोळी (60, शेळगाव, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

तोल जावून पडल्याने मृत्यू
रमेश कोळी हे आपल्या पत्नी व मुलासह जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे वास्तव्याला आहे. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 18 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता रमेश कोळी हे अन्नपूर्णा माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. हे मंदिर शेळगाव धरणाजवळ असून या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांचा तोल जावून पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली परंतु त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही.

पाण्यावर तरंगताना आढळला मृत्यू
सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता शेळगाव गावातील हेमंत कोळी, भगवान कोळी आणि सुभाष कोळी हे शेळगाव धरणात पोहण्यासाठी गेले. रमेश कोळी यांचा मृतदेह शेळगाव धरणाच्या पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यांनी तातडीने नशिराबाद पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.