जळगावातील गौरव पार्कमधील बंद घरातून 20 हजारांची रोकड लंपास

0

20,000 cash stolen from a locked house in Gaurav Park, Jalgaon जळगाव : बंद घरांना चोरट्यांकडून सातत्याने टार्गेट केले जात आहे. पिंप्राळा परिसरातील गौरव पार्कमधील बंद घरातून 20 हजारांची रोकड लांबविल्यात आली. ही घटना सोमवार, 13 नोव्हेंबर रोजी उघडकीला आली. घरमालक घरी आल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलिसात फिर्याद दिल्याने सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
गणपत व्यंकटराव धुमाळे (42, गौरव पार्क, पिंप्राळा, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवाळीनिमित्त गणपत धुमाळे हे आपल्या परिवारासह मुळगावी लोणी, ता.देगलूर, जि.नांदेड येथे शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कूलप तोडून आत प्रवेश करत घरातील टेबलाच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली 20 हजारांची रोकड लांबवली. त्यांच्या शेजारी राहणारे रमेश बोरसे यांना गणपत धुमाळे यांच्या घराचे दरवाजावरील लॉक तुटलेले दिसले. त्यानुसार घरात चोरी झाल्याबाबत धुमाळे यांना कळविले. त्यानंतर धुमाळे हे रविवार, 19 नोव्हेंबर रोजी घरी आले तेव्हा घरात सर्व सामान पसरलेला दिसून आला व टेबल्याच्या ड्रॉव्हरमधून 20 हजार रूपयांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. धुमाळे यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता रामानंद नगर पोलिसात तक्रार नोंदवली.


कॉपी करू नका.