शासनाची दिशाभूल करीत अपहार : मजरेहिंगोणा ग्रा.पं.च्या तत्कालीन सरपंचांसह पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा


Embezzlement by misleading the government : Crime against the office bearers including the then sarpanch of Majrehingona district चोपडा : चोपडा तालुक्यातील मजरेहिंगोणा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच, उपसरपंचांसह सदस्य आणि तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

शासनाची दिशाभूल करीत अपहाराचा आरोप
चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील ग्रामपंचायतीत पंचायतराज अंतर्गत तत्कालीन सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी सन 2022-23 मध्ये पदावर कार्यरत असताना त्यांनी पोपट यादव पाटील पिंताबर दौलत धिवर, उत्तम बाबुराव पाटील, ज्ञावेश्वर सिताराम पाटील हे अनुक्रमे सन 2009,2013,2014,2019, मयत झालेले असताना त्यांच्या नावाने खोटे दस्ताऐवज तयार करुन खोट्या सह्या करुन शासनाकडुन 26 हजार 157 रुपये काढून शासनाची दिशाभुल करुन शासनाकडून येणार्‍या रकमेचा स्व:ताच्या फायद्यासाठी अपहार केला.



यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून कल्पनाबाई जिजाबराव पाटील (50, सरपंच), नंदकिशोर चिंधु सांगोरे (48, उपसरपंच), करुणा रामकृष्ण ईधाटे (35, घरकाम), मालती भागवत पाटील (36, सदस्या), आशाबाई नाना भील (51, सदस्या), साहेबराव छगन पाटील (68, सदस्य), संगीताबाई छगन पाटील (42, सदस्या), शांताराम आर पाटील (58, तत्कालीन ग्रामसेवक, सर्व रा.मजरेहिंगोणा, ता.चोपडा जि.जळगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 406, 420, 464, 468,427, 477 (-), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शामकांत बोरसे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !