गिरणा काठावर 120 ब्रास अवैध वाळू साठा : डंपर मालकासह तिघांविरोधात गुन्हा
120 brass illegal sand stock on mill bank : Crime against three including dumper owner जळगाव : उत्राण (ता.एरंडोल) येथे गिरणा नदीच्या काठावर सुमारे 120 ब्रास वाळू साठा प्रकरणी महसुल प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या तक्रारीवरुन डंपर मालक, जेसीबी मालक तसेच ट्रॅक्टर मालक यांच्याविरुध्द कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांची तक्रार
वाळू साठ्याजवळ असलेले ही वाहने संशयित घेवून गेल्याचे समोर आले आहे. माहिती कार्यकर्ता अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या साठ्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तहसीललदार एरंडोल यांच्या आदेशाने तलाठी शेख शकील अहमद अयाजोद्दीन यांनी रविवार, 19 रोजी उत्राण येथे पाहणी केली. गिरणा नदीच्या पात्रातून अवैध वाळूचे उत्खनन करुन काठावर वाळूचा साठा करण्यात आला होता. डंपर क्रमांक (एम.एच.40 ए.के.2224) या डंपरचा तसेच जेसीबीच्या मदतीने हा अवैध साठा करण्यात आला. याठिकाणी सुमारे 72 हजार रुपये किंमतीची सुमारे 120 ब्रास वाळू निदर्शनास आली.


