पहूरच्या तरुणाचा वीज धक्याने दुर्दैवी मृत्यू


Unfortunate death of Pahur youth due to electric shock पहूर : विजेचा धक्का लागल्याने पहूर येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही कारवाई बुधवार, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. प्लग आणि वायर यांची जोडणी करत असताना विजेचा शॉक लागल्याने दीपक सुरेश वारुळे या तरुणाचा मृत्यू झाला.

जबर धक्का बसल्याने मृत्यू
शिवनगर भागात राहणार्‍या दीपक सुरेश वारुळे हा तरुण प्लग आणि वायर यांची जोडणी करत असताना त्यास विजेचा जबर धक्का बसल्याने त्याची शुद्ध हरपली. शेजारील रहिवाशांनी त्यास तातडीने उपचारार्थ पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविले.



पहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ.नजमुद्दीन तडवी, डॉ.रुपाली पाटील, परीचारिका योगीता नागरे, वैशाली पाटील यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणाच्या पश्चात विधवा आई व विवाहित बहिण आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !