जळगावातील सराफा व्यावसायीकाचे दुकान फोडत 11 लाखांचे दागिने लांबवले
Jewelery worth 11 lakhs was stolen by breaking into the shop of a bullion dealer in Jalgaon जळगाव : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सराफा दुकानातून तब्बल 11 लाखांचे दागिने लांबवण्यात आल्याने शहरातील सराफा व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही घरफोडी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील जोशीपेठमधील संभव ज्वेलर्स या दुकानात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे लॉक तसेच आतील चॅनलगेटचे कोयंडे कापून कारागिरांच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पावणेअकरा लाख रुपये किंमतीचे 189 ग्रॅम सोने आणि सोन्याचे रॉ मटेरीयल लांबवले.
धाडसी घरफोडीने खळबळ
शहरातील आदर्श नगरात किशोर ओमप्रकाश वर्मा हे वास्तव्यास असून त्यांचे जोशीपेठ परिसरातील कालभैरव मंदिराजवळ संभव ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर वर्मा यांचे ऑफिस आहे. तर दुसर्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनविण्याचे काम सुरु असते त्यांच्याकडे आठ कारागिर असून ते गेल्या अनेक वर्षांपासून बंगाली कारागीर सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. हे कारागिर सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. त्यामुळे वर्मा हे वडीलांसह दुकानाचे शटर उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी जात असतात.


रात्री दहा वाजता बंद केले दुकान
वर्मा यांनी खरेदी केलेले सोने हे ऑर्डप्रमाणे त्यांचे दागिने बनविण्यासाठी त्याला मेल्टींग करुन ते कारागिरांकडे देवून त्यांच्याकडून दागिने बनवून घेतात. घरी किशोर वर्मा यांनी त्यांच्याकडे काम करणारा कारागिर मिलन चित्तरंजन पाकिरा याला दोन ते तीन दिवसांपुर्वी 100 ग्रॅम तर सुधार मदन सामंत याच्याकडे 100 ग्रॅम तर सुशांत राधानाथ मायती याच्याकडे 48 ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिले होते. मंगळवारी दिवसभर काम केल्यानंतर वर्मा हे रात्री साडेआठला तर त्यांचे कारागिर हे रात्री दहा वाजता दुकान बंद करुन त्यांच्या रुमवर निघून गेले.
दुकानाचे शटरसह चॅनल गेट तोडून केला प्रवेश
मंगळवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास किशोर वर्मा यांना त्यांच्यादुकानाजवळ राहणार्या अनिल वर्मा यांनी तुमच्या दुकानात चोर घुसल्याची माहिती दिली. त्यानुसार वर्मा हे वडिल व मोठ्या भावाला घेवून तत्काळ दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे लहान शटरचे कान तर आतील चॅनल गेटचे कोयंडे तुटलेले दिसले. त्यांनी दुकानाच्या दुसर्या मजल्यावर जावून पाहणी केली. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर फॉरेन्सीक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.
