धरणगाव तालुक्यातील तरुणाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू


A young man from Dharangaon taluka died after being hit by a truck धरणगाव : धरणगाव तालुक्यातील नांदेडच्या तरुणाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात पिंपळे व निशाणी फाट्याजवळ गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडला. धरणगाव पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर छगन कोळी (28, रा.नांदेड, ता.धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

नांदेड गावात शोककळा
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे सागर कोळी हा तर आपले आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. धरणगाव शहरात आठवडे बाजार दर गुरुवारी भरतो. या निमित्ताने सागर कोळी हा गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता दुचाकी क्रमांक (एम.पी. 46 एम.के.316) यावरून धरणगाव शहरात बाजारात जात असताना पिंपळे व निशाणी फाट्याच्या जवळील रस्त्यावरून जात असतांना समोरून अज्ञात भरधाव ट्रकने त्याच्या दुचालिकेला जोरदार धडक दिली. या धडकेत सागर कोळी हा तरुण जागीच ठार झाला



अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा
अपघात घडल्यानंतर ट्रक चालक हा ट्रकाह पसार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मयत तरुणाच्या कुटुंबाने एकच आक्रोश केला. या संदर्भात सागर कोळी यांचे काका भागवत यशवंत कोळी यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिल्यावरून दुपारी दोन वाजता अज्ञात ट्रक चालक विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक प्रदीप पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !