कन्नड घाटात भीषण अपघातात चौघे ठार !
Four killed in a terrible accident in Kannada Ghat! चाळीसगाव : तवेरा वाहन कन्नड घाटात उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे प्रवासी जागीच ठार झाले तर अन्य सात प्रवासी जखमी झाल्याची घटना
सोमवारी मध्यरात्री घडली. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अक्कलकोट येथून दर्शन घेवून हे भाविक परतत असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.


चौघे जागीच ठार
तवेरा क्रमांक (एम.एच.41 व्ही.4816) वाहनाचा अपघात होवून त्यात प्रकाश गुलाबराव शिर्के (65), शिलाबाई प्रकाश शिर्के (60), वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी, (35), पूर्वा गणेश देशमुख (08) हे चार प्रवासी जागीच मयत झाले असून रुपाली गणेश देशमुख (30), अनुज धर्मेंद्र कृष्णा वासुदेव शिर्के (4), जयेश धर्मेंद्र सूर्यवंशी (17), सिध्देश पुरुषोत्तम पवार (12), पुष्पा पुरूषोत्तम पवार (35), अभय पोपटराव जैन (50) हे सात जण जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. परीसरातून नागरिक आणि वाहन चालक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दोन्ही बाजूने वाहने उभे राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
