एरंडोल शहरात कत्तलीपूर्वीच 20 गुरांची सुटका : तिघांविरोधात गुन्हा

धरणगावच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा !


Rescue of 20 cattle before slaughter in Erandol town: Crime against three एरंडोल : आयशर वाहनात निदर्यीपणे गुरे कोंबून ते कत्तलीच्या उद्देशाने घेवून जाणारे वाहन शनिवारी रात्री धरणगावसह एरंडोलच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रवींद्र राजेंद्र माळी (रा.बिलाडी रोड, बिलाडी रोड, देवपूर, धुळे,), आबा बजरंग पाटील (देवपूर, धुळे) अव इमरान कंजा कुरैशी (कॉटन मार्केट, पारोळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आयशर वाहनातून दहा गायी व दहा वासरांची सुटका करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
याप्रकरणी श्रीपाद शंभुप्रसाद पांडे (42, वाणी गल्ली, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवार, 25 रोजी रात्री 9 वाजेच्या मित्र अजिंक्य काळे याचा फोन आला आणि त्याने सांगितले की, एरंडोल शहरातील कासोदा नाका येथे एक आयशर गाडी (एम.एच.18 बी.जी.7040) हीच्यात गाई व लहान वासरे ही जिवंत दोराच्या सहाय्याने बांधून कत्तलीसाठी नेण्याचे उद्देशाने निष्काळजीपणे कोंबून ठेवली आहेत. या घटनेची माहिती मिळताच श्रीपाद पांडे हे एरंडोलचे मित्र आकर्ष तिवारी, संजय छगन महाजन (रा. धरणगाव) यांच्या सोबत पोहचलो. तेव्हा तेथे अजिंक्य काळे, निरज अतुलकुमार जगताप, चंद्रकांत सुरेश पारखे हे देखील उपस्थित झाले.



निदर्यपणे गुरांची वाहतूक
काच फुटलेल्या आयशर गाडीत निर्दयीपणे गुरे बांधून ठेवण्यात आलेली असल्याचे दिसून आलीत. याबाबत आयशरमधील व्यक्तींना विचारपूस केली असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. यामुळे श्रीपाद पांडे यांच्या घटनास्थळी उपस्थित लोकांनी आयशर गाडीतील लोकांची विचारपूस केली असता त्यांनी आपला परीचय रवींद्र राजेंद्र माळी (36, मानव केंद्राच्या बाजुला, वारे नगर, बिलाडी रोड, देवपूर, धुळे, ता. जि. धुळे), आबा बजरंग पाटील (45, दुर्गा माता मंदीराजवळ, वीट भट्टी, देवपूर, धुळे) तसेच इमरान कंजा कुरैशी (24, कॉटन मार्केट, पारोळा रोड, धुळे, मूळ रा.मोहल्ला गोपालपुरा, वॉर्ड नं.-22, शमशाबाद, आगरा, उत्तर प्रदेश) असा सांगितला. यानंतर आयशर वाहन एरंडोल पोलिस स्थानकात नेण्यात आले. आयशर वाहन आणि गुरे असा एकूण 20 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !