धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू


जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगाव शहरातील गवळीवाडा परीसरातील राहुल रामदास गवळी (28) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदगाव ते मनमाड दरम्यान घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी पटवली ओळख
शहरातील शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यात राहुल गवळी हा तरुण वास्तव्यास होता. हातमजूरी करीत तो कुटुंबाला हातभार लावित होता. शुक्रवार, 24 नोव्हेंबर राहुल हा रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्याचा तोल जावून तो रेल्वेतून खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्टेशन प्रबंधक यांनी रेल्वे पोलिसांन दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाची ओळख पटवून मृतदेह जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !