गुढ्यातील दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू


Accidental death of bike rider in Gudde भडगाव : दुचाकी चालवताना अचानक कुत्रा समोर आल्यानंतर झालेल्या अपघातात गुढ्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत काशीाथ माळी-महाजन (52, गुढे, ता.भडगाव) असे मयताचे नाव आहे.

ऊस वाहतूक करणार्‍या वाहनावर आदळली दुचाकी
भरत माळी हे आपल्या परिवारासह भडगाव तालुक्यातील गुढे येथे वास्तव्याला होते. गुरुवार, 16 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता त्यांची दुचाकी क्रमांक (एम.एच.19 बी.एक्स.7376) ने कामावरून घरी जात असताना गुढे गावाजवळ नामदेव मोरे यांच्या शेतासमोर अचानक कुत्रे आडवे आले. त्याला घाबरून त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि थेट ऊस वाहतूक करणार्‍या लोखंडी गाडीला धडकले.



या धडकेत त्यांच्या मांडीला डोक्याला मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत अखेर शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !