फैजपूरातील प्रति पंढरपूर रथोत्सवाच्या दर्शनार्थ भाविकांची मांदियाळी


Mandiyali of devotees to see Prati Pandharpur Rathotsava in Faizpur फैजपूर : प्रति पंढरपूर फैजपूर ऐतिहासीक नगरीत शहरातील संतश्री खुशाल महाराज देवस्थानचा अखंडीत 175 वा स्वयंभू पांडुरंग रथोत्सव रविवार, 26 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वरुण राजाच्या वर्षावात श्री खुशाल महाराज की जय या घोषणांनी रथोत्सव मोठ्या जल्लोषात झाला.

फैजपूर येथील पांडुरंगाच्या रथोत्सोवाला 175 वर्षांची परंपरा लाभली आहे. कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त परंपरेनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या फैजपूर जागृत स्वयंभू श्री पांडुरंगाचा रथोत्सव 26 नोव्हेंबर रोजी फैजपूर शहरासह पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्तगणांचा जनसागर उसळला होता. प्रारंभी मुख्य पूजेचे यजमान जोडपे शहरातील व्यापारी विजय आठवाणी सपत्नीक यांच्याहस्ते ब्राह्मणांच्या उपस्थित महाआरती होऊन यानंतर श्री खुशाल महाराज की जय घोषणांनी पांडुरंगाची मूर्ती उचलून नगरप्रदक्षिणेसाठी मूर्ती रथात स्थानापन्न करण्यात आली.







या मान्यवरांची उपस्थिती
ब्राह्मणवृंद मंत्रघोष झाल्यानंतर महाआरतीचे यजमान म्हणून जे.टी.महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालय, फैजपूर अध्यक्ष शरद महाजन तर आमदार शिरीष चौधरी, विद्यापीठ सिनेट सदस्य हभप नरेंद्र नारखेडे, गोलू महाराज, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, शिवा नेहेते, कामगार नेते किरण चौधरी, योगेश भावसार, संजय रल, रवींद्र होले, प्रभाकर चौधरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पंचक्रोशीतील संत-महंत तसेच राजकीय शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते रथोत्सव मिरवणुकीची दुपारी 3:30 ला महापूजा करण्यात आली. यावेळी रथावर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त गादीपती खुशाल महाराज यांचे सहावे वंशज ह.भ.प. पुंडलिक महाराज, हभप प्रवीणदास महाराज, ब्राह्मणवृंद उपस्थित होते.

भजनी मंडळाचा सहभाग
रथोत्सव मिरवणूकीत भावसार समाजबांधव व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगर प्रदक्षिणेसाठी रथोत्सव श्री खुशाल महाराज की जय या घोषणांनी प्रारंभ झाला. रथ लककडपेठ चौकात येताच वरुणराजाने या रथयात्रेवर वर्षाव सुरू केला. यानंतर सुभाष चौक, श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर येथे रथाचे आगमन झाल्यावर महाआरती करण्यात आली. रथोत्सवाची सुरुवात रथगल्लीतून लक्कडपेठ, मारुती मंदिर, सुभाष चौक, खुशालभाऊ रोड, जुन्या हायस्कूल मार्गे ब्राह्मणगल्ली मार्गे रथोत्सव मिरवणूक काढण्यात येवून रथगल्ली येथे मिरवणुकीचे समारोप करण्यात आला. रथोत्सव मिरवणुकीत पंचक्रोशीतील सर्व वारकरी-टाळकरी मंडळी तसेच परिसरातील हरे राम हरे कृष्णा भजनी मंडळ सहभागी झाले होते.

रथोत्सव मार्गावर रांगोळ्या
रथोत्सव मार्गावर मोठ्या प्रमाणात आकर्षक रांगोळ्या काढून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून रथाचे जंगी स्वागत करण्यात आले. रथोत्सव मार्गावर दुतर्फा भक्तगणांनी गर्दी केली होती. यावेळी शहरात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते.तर नवचैतन्य तसेच भक्तिमय वातावरण दिसत होते. हा प्रसंग अनेकांनी सेल्फी घेत आनंद व्यक्त केला. रथोत्सव मिरवणूकीत प्रारंभी शिवाजी चौक जळगांव येथील देवीरूपी सोंगाडे शेखर पोदार, अनंत जंजाळे, शुभम साबळे, भगवान होले व शिव भगवान वेताळ मंडळ विविध नृत्य सादर करून लक्ष वेधत होते. तसेच विविध प्रकारची प्रात्यक्षिक आणि बाहुबली बजरंगबली व गदाचे विशेष आकर्षण ठरले. तद्नंतर वाहनावर संतश्री खुशाल महाराजांची मूर्ती होती त्यापाठोपाठ पांडुरंगाचा रथाचे आगेकूच होत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, जितेंद्र भावसार, संकेत तांबट, संजय जैन, हरीष भावसार, नामदेव भंगाळे, सुनील सोनवणे, सह रथगल्ली मित्र मंडळाने सदस्यांनी रथाचे चाकांना मोगरी लावून दिशादर्शक काम केले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
दरम्यान, रथोत्सव मिरवणूकीत फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, पोलिस उपनिरीक्षक मकसुद्दीन शेख, पोलिस उपनिरीक्षक मयनुद्दीन सैय्यद, पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार रशीद तडवी, योगेंद्र मालविया, अमजद पठाण, रवींद्र मोरे, राजेश बर्‍हाटे, गोपनीय पोलिस योगेश दुसाने, विजय चौधरी, राहुल चौधरी, सानप यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी बंदोबस्त राखला.

वीज वितरण कंपनीचे सहकार्य
रथोत्सव मार्गावर वीज तारांना अडथळा येणार नाही म्हणून वीज वितरण कनिष्ठ अभियंता सरोदे व त्यांचे कर्मचारी लक्ष ठेवून होते. त्याचप्रमाणे महसुलतर्फे फैजपूरचे तलाठी तेजस पाटील रथोत्सवात उपस्थित होते. सालाबादाप्रमाणे रथोत्सव साजरा करण्यासाठी रथगल्ली मित्र मंडळाच्या सदस्य व भावसार समाज बांधव, यावल, रावेर तालुक्यातील वारकरी भजनी मंडळ, फैजपूर ग्रामस्थ, इस्कॉन भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले. परंपरागत पध्दतीने सालाबदाप्रमाणे 175 व्या वर्षी देखील मोठ्या जल्लोषात शहरातून रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. रथोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती.

रांगोळीचे आकर्षण
पफैजपूर येथे रथाच्या स्वागतासाठी सुभाष चौकात महाकाय रांगोळी विशेष लक्षवेधी फैजपूर येथे 175 व्या अमृत महोत्सव निमित्त संस्कार भारतीय टाकाऊ पासून टिकाऊ रांगोळी काढण्यात आली. रांगोळीसाठी 40 किलो लाकडाचा भुसा, 35 किलो झेंडूची फुले, कापूस, केळीचे फुल 50 किलो रंगीत रांगोळी वापरून महाकाय भव्यदिव रांगोळी काढण्यात आली. कला शिक्षक राजू साळी, विकी जयस्वाल, निलेश दालवाले, ललित कोष्टी, राजू कुंभार, राधिका काठोके, गुलशेर तडवी, अबूबकर, मानव काठोके इत्यादींनी सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !