जळगाव नियंत्रण कक्षातील पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू
A policeman in Jalgaon control room died of heart attack जळगाव : हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षातील हवालदार गोविंद प्रेमचंद मोरे यांचा सोमवारी सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. या घटनेेने पोलिस वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात आली.
कर्तव्यावरच आला हृदयविकाराचा झटका
पोलिस दलात 1993 मध्ये शिपाई म्हणून रुजू झालेले गोविंद मोरे हे पोलिस मुख्यालयात कंट्रोल रुमला रविवारी रात्रीपाळीवर कामाला होते. रात्रपाळीत लाईट गेल्याने ठिकठिकाणी सहकार्यांसोबत राऊंड मारल्यानंतर पहाटे साडेचार वाजेला ते परत आले. त्यानंतर सकाली थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते वॉशरूमला फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले व परत न आल्याने सहकार्यांनी पाहिले असता बेसीनसमोर ते पडलेले आढळले. त्यांना सुरुवातीला आर्किड रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जीएमसीत आणून येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृत हेड कॉन्स्टेबल मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सिद्धेश व मुलगी चैताली असा परीवार आहे.








