मेहुणबारेनजीक खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स उलटली : 12 प्रवासी जखमी
Private Passenger Travels Overturned Near Mehunbare : 12 Passengers Injured चाळीसगाव : चालक आणि प्रवाशांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस उलटल्याने 12 प्रवासी जखमी झाले. मंगळवार, 28 नोव्हेंब ररोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
वादानंतर उलटली बस
चाळीसगावातून एच.के.ट्रॅव्हल्सची बस अहमदाबादकडून छत्रपती संभाजीनगरकडे (जी.जे.01 ईटी 9906) जाण्यासाठी निघाल्यानंतर मेहुबणारे गावाजवळील गिरणा पुलाजवळ प्रवासी व चालक यांच्यात मोबाईल चार्जिग पॉईंट बंद असलेला चालु करा या विषयावरुन वाद चालू होता व ते प्रवाशी गाडी थांबवण्याबाबत सांगत होते. पण चालक गाडी थांबवण्यास तयार नव्हते. प्रवाशी हे चालक जवळ जाऊन त्यांना विनंती करत होते व वाद ही घालत होते. या वादामुळे अचानक गाडी रोडाच्या खाली जाउन पलटी झाली. या अपघातात बसमधील 12 प्रवाशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सहा.निरीक्षक रूपाली पाटील, पोलिस उपनिरीक्षक अशोक चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु करीत जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले.


बस चालकाविरोधात गुन्हा
अपघात झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघाग्रस्त बस बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी शेख जावेद शेख जमील (37, संभाजीनगर) यांच्या फिर्यादीवरून (जी.जे.01-9906, वरील चालक नाव गाव माहित नाही) यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार शामकांत सोनवणे करीत आहेत.
