परप्रांतीय गांजा तस्कर शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात

13 किलो गांजा जप्त : अटकेतील आरोपी राजकोटचे रहिवासी


Foreign ganja smuggler in Shirpur police net शिरपूर : गुजरातच्या राजकोट भागातील दोघा गांजा तस्करांना शिरपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 64 हजार 200 रुपये किंमतीचा 13 किलो गांजा जप्त केला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील बस स्थानक परीसरात ही कारवाई करण्यात आली. हुसेन मोहम्मद हानीफ नागाणी उर्फ सय्यद (19, रा.चोरडी दरवाजाजवळ, सावजवाडी, फुलवाडी गल्ली, गोंडल,. ता.गोंड, जि.राजकोट, राज्य गुजरात) व सुनील उर्फ किरण भावेशभाई सियाल (19 , रा.लोहानगर, राजकोट, गुजरात) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर बसस्थानकात गांजा तस्कर येणार असल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पथकाने मंगळवारी रात्री 10 वाजता दोघा परप्रांतीय गांजा तस्करांना अटक केली. 64 हजार 200 रुपये किंमतीचा गांजा सदृश्य पदार्थ व तीन हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा 67 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेब भूषण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप दरवडे करीत आहे.



यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम आगरकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप दरवडे, हेमंत खैरनार, डीबी पथकाचे हवालदार ललित पाटील, रवींद्र आखलमल, विनोद आखडमल, गोविंद कोळी,प्रशांत पवार, योगेश दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज महाजन आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !