जळगावातील पाच जणांची गुन्हेगारी टोळी हद्दपार


Criminal gang of five people from Jalgaon deported जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवी प्रवृत्तींविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून धडक कारवाईचा सपाटा कायम आहे. यापूर्वी अनेकांवर मोक्कासह हद्दपारीची कारवाई केल्यानंतर जळगावातील पाच जणांच्या गुन्हेगारी टोळीला हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. टोळी प्रमुख हितेश संतोष शिंदे (25), संतोष उर्फ जांगो रमेश शिंदे (45), आकाश उर्फ नागतोड्या संजय मराठे (22), सुमीत उर्फ गोल्या संजय मराठे (27), संजय देवचंद मराठे (50, सर्व रा.चौगुले प्लॉट, कांचन नगर, जळगाव) अशी हद्दपार टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

टोळीची सर्वत्र दहशत
टोळीतील सदस्यांविरोधात शनिपेठ, जिल्हा पेठ, एमआयडीसी, जळगाव शहर पोलिसात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, दुखापत, घातक हत्यार बाळगणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी आदेशाचे उल्लंघण या सदराखाली सात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. संशयितांनी गुन्हे टोळीने केलेले आहेत. या पाचही जणांची टोळी जळगाव शहरात ठिक-ठिकाणी दहशत पसरत असल्याने नागरीकांच्या जीवाला धोका तसेच जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांच्याविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने संशयिताना हद्दपार करण्यासाठी शनिपेठ निरीक्षक रंगनाथ धारबडे, एएसआय संजय शेलार, हवालदार अश्विन हडपे, परीष जाधव, कॉन्स्टेबल राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकूंदा गंगावणे आदींनी प्रस्ताव तयार करीत तो जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला.



संशयित दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी प्रस्तावाची चौकशी करीत पाचही जणांना दोन वर्षाकरीता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले. हद्दपारीच्या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्यासह युनूस शेख इब्राहिम, हवलदार सुनील पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे. हद्दपार प्रस्तावाची चौकशी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !