पाचोरा पोलिस ठाण्याच्या फौजदाराविरोधात मारहाणीचा गुन्हा


A case of assault against the Faujdar of Pachora Police Station पाचोरा : पाचोरा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली. एका तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा येथील पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयावरून मारहाणीचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 व 24 नोहेंबर रोजी कॉलेज ग्राउंड व सिंधी कॉलनी परिसरात उल्हासनगर येथील प्रथम संदीप गायकवाड (19) या तरुणास संशयावरून वल्टे यांनी शिवीगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेले प्रथमचे मामा संदीप ब्राह्मणे यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात उपनिरीक्षक वल्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !