भडगावातील वाळू माफिया स्थानबद्ध

जळगाव जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने गुन्हेगारी खळबळ


Sand mafia located in Bhadgaon भडगाव : भडगाव तालुक्यातील वाक येथील वाळू माफियाला जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी स्थानबद्ध (एमपीडीए) करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संजय सुरेश त्रिभुवन (वाक, ता.भडगाव) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

सहा गुन्हे दाखल
संजय त्रिभुवन याच्याविरोधात पाचोरा पोलिसात एक तर भडगाव पोलिसात पाच गुन्हे दाखल आहेत. शासकीय कामात अडथळा, वाळू चोरीसह यासह विविध गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. संशयिताविरोधात यापूर्वी भडगाव पोलिसात दोनवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली मात्र त्यानंतरही त्याच्या कृतीत सुधारणा होत नसल्याने भडगाव पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला व गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी प्रस्तावाचे अवलोकन करीत हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केल्यानंतर स्थानबद्धतेचे आदेश पारीत करण्यात आले.



नागपूरात रवानगी
संशयित त्रिभुवन याी आदेश येताच पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे, जितू राजपूत आदींनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !