फोटोंना लाईक करण्याच्या टास्कद्वारे जळगावातील डॉक्टरांना 12 लाखांचा गंडा
12 lakhs to doctors in Jalgaon through the task of liking photos जळगाव : यवतमाळ येथील मूळ रहिवासी व हल्ली जळगावस्थित 28 वर्षीय डॉक्टरांना ऑनलाईन फोटोंना लाईक करण्याचे टास्क देत तब्बल 12 लाख 42 हजार 370 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात ईरा-आदित्य नामक टेलिग्राम धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
28 वर्षीय डॉक्टर जळगावातील शासकीय महाविद्यालयाच्या आवारात वास्तव्याला असून ते मूळचे यवतमाळचे रहिवासी आहेत. त्यांना टेलिग्रामद्वारे ओळख झालेल्या संशयितांनी ऑनलाईन फोटोंना टास्क केल्यास पैसे देण्याचे आमिष दिले व सुरूवातीला त्यांना त्याद्वारे नऊ हजार 150 रुपये देण्यात आल्याने त्यांचा विश्वास बळावला. जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी त्यांनी तब्बल 12 लाख 42 हजार 370 रुपये गुंतवले व नंतर आपली फसवणूक होताच जळगाव सायबर पोलिसात धाव घेतली. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.


