चोपड्यात सहाय्यक पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला : सात अटकेत

गुरांची अवैध वाहतूक रोखल्याचा रागातून टोळक्याचे कृत्य : जमावाविरोधात गुन्हा


Assault on Assistant Police Inspector in Chopda : Seven arrested चोपडा : कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असताना चोपडा पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून टोळक्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील शेतपुरा भागाजवळील कत्तलखान्यानजीक घडली. याप्रकरणी आठ आरोपींसह जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली.

कारवाईच्या रागातून टोळक्याचा हल्ला
शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास अवैद्यरीत्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असताना गोरक्षक दलाने वाहन शेतपुराजवळील कत्तलखान्याजवळ पकडले. यावेळी घटनास्थळी जमाव जमल्यानंतर चोपडा शहर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित नथू सावळे यांच्यावर टोळक्याने हल्ला चढवला. लोखंडी फायटरसह काठीने मारहाण करण्यात आली तसेच सावळे यांना जीवे ठार मारण्याची धमकीदेखील देण्यात आली व शासकीय कामात अडथळा आणण्यात आला.



यांच्याविरोधात गुन्हा दाखल
शेख साजीद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी, शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी, झियाऊद्दीन गयासुद्दीन काझी, शेख इब्राहीम शेख हमीद कुरेशी, शेख नाजीम शेख युनूस, शोएब सलीम कुरेशी, रईस रज्जाक कुरेशी (सर्व रा.साने गुरुजी वसाहत, चोपडा) व इतर 10 ते 15 लोकांविरोधात सहाय्यक निरीक्षक अजित सावळे यांच्या फिर्यादीवरुन गुरनं.609/2023 भादंवि कलम 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 323, 506, 427,109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सात आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !