जळगावातील प्रौढाचा मालवाहू वाहनाच्या धडकेने मृत्यू


An adult in Jalgaon died after being hit by a cargo vehicle जळगाव : जळगावातील 60 वर्षीय प्रौढाचा मालवाहू वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. मुरलीधर वासुदेव पराते (60, माऊली नगर, दूरदर्शन टॉवरजवळ) असे मयताचे नाव असून या अपघातात त्यांचा मुलगा विजय मुरलीधर पराते (25) हा जखमी झाला. हा अपघात 1 डिसेंबर रोजी जळगाव-भुसावळ मार्गावरील माऊली नगरनजीक झाला. या प्रकरणी मालवाहू वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालवाहू वाहनाने दुचाकीला उडवले
खाजगी नोकरदार विजय पराते हे वडील मुरलीधर पराते यांच्यासह दुचाकीने (एम.एच.19 सी.क्यू.5545) जळगावकडून भुसावळकडे जात असताना भरधाव मालवाहू वाहना (एम.एच.19 सी.वाय.2366) ने धडक दिली. त्यात मुरलीधर पराते यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. विजय पराते यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी विजय परातेंच्या फिर्यादीवरून धडक देणार्‍या मालवाहू चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार विजय पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !