उभ्या ट्रॅक्टरवर भरधाव दुचाकी आदळली : पिळोद्यातील वयोवृद्ध दाम्पत्याचा मृत्यू


A speeding two-wheeler collided with a standing tractor : an elderly couple died in Piloda अमळनेर : पारोळा शहराकडून गावाकडे परतणार्‍या पिळोद्यातील वयोवृद्धाची दुचाकी उभ्या ट्रॅक्टरवर धडकल्याने झालेल्या अपघातात 62 वर्षीय वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सप्तशृंगी मंदिराजवळ घडला. युवराज दयाराम पाटील (62, रा.पिळोदा) व मंगलबाई युवराज पाटील (55, पिळत्तेदा) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जबर धडकेने जागीच मृत्यू
युवराज पाटील व त्यांच्या पत्नी मंगलबाई पाटील या दुचाकीने पारोळा येथे गेल्यानंतर सोमवारी सायंकाळी घराकडे परतत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टर (एम.एच.19 सी.व्ही.1332) हे रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकल्याने युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर मंगलबाई गंभीर जखमी झाल्या. तातडीने नागरीकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. याप्रकरणी अक्षय किशोर पाटील (पिळोदा) यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. हवालदार सुनील पाटील यांनी पंचनामा केला. तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !