धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला दहा वर्ष शिक्षा


Abuse of minor girl in Dharangaon taluka: Accused sentenced to 10 years धरणगाव : धरणगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात नराधम आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड सोमवारी सुनावला. योगेश दिनकर कोळी (अमळनेर तालुका) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार
धरणगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन पीडीता 6 डिसेंबर 2021 रोजी रात्री नऊ वाजता नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडल्यानंतर आरोपी योगेश दिनकर कोळी याने तिच्या तिचे तोंड दाबत तिला एका जुन्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जर तू ओरडली तर तुला जीवे ठार मारेल, धमकी दिली. पीडीतेने रात्री साडेबारा वाजता घरी गेल्यानंतर हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर 7 डिसेंबर 2021 रोजी आरोपी योगेश दिनकर कोळी याच्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



पीडीतेची साक्ष ठरली महत्त्वाची
गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. न्यायाधीश एस.एन.राजूरकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानुसार न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवत 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड सुनावला. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार ताराचंद जावळे यांनी काम मदत केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा शासकीय वकील सुरेंद्र कांबळे यांनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !