धरणगावात बसमध्ये चढताना महिलेचे 40 हजारांचे दागिने लांबवले
A woman’s jewelery worth 40 thousand was stolen while boarding a bus in Dharangaon धरणगाव : बसमधील गर्दीचा फायदा घेत भामट्याने महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि चार हजारांची रोकडसह 40 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना गुरुवारी दुपारी धरणगाव बस स्थानकात घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
भारती जालिंदर पाटील (40, रा.कुकावल, ता.शहादा, जि.नंदुरबार) या गुरुवार, 7 रोजी कुकावल, ता. शहादा येथे जाण्यासाठी धरणगाव बस स्थानकात आल्या असता जळगाव-अंकलेश्वर जाणार्या बसमध्ये चढत असतांना दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधील 21 हजार रुपये किंमतीचे सात ग्रॅम वजनाचे मनीमंगळसूत्र, 15 हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे फुल साखळी आणि 4 हजाराची रोकड असा ऐवज लंपास केला.


दरम्यान, चोपडा बस स्थानक आल्यानंतर भारती पाटील यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. यावेळी बस कंडक्टरने धरणगाव बस स्थानकात गर्दी होती, त्यावेळी दोन संशयित महिला दिसल्याचे सांगितले. त्यामुळे भारती पाटील यांनी तत्काळ धरणगाव पोलिस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. पुढील तपास नाईक उमेश पाटील हे करीत आहेत.
