जळगाव शहर खुनाने हादरले : जुन्या वादातून तरुणाची हत्या

तरुणाला टेकडीवर बोलावर केले चॉपरने वार : दोघे जखमी


Jalgaon city rocked by murder : Youth killed due to old dispute जळगाव : शहरातील समता नगरातील 28 वर्षीय तरुणाचा चॉपरचे वार करीत निर्घृृण खून करण्यात आला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
अरुण बळीराम सोनवणे (28, समता नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. आरोंपीच्या हल्ल्यात मयताचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

आधी मिटला वाद नंतर पुन्हा उफाळला
जळगाव शहरातील समता नगर परिसरात जुन्या वादातून रविवारी सकाळी काही तरुणांसोबत मयत अरुण याच्यासोबत वाद झाला. काहींच्या मदतीने वाद मिटवण्यात आला होता, परंतु दुपारी तीन वाजता पुन्हा हा वाद उफाळून आला. मारेकर्‍यांनी मयत अरुण बळीराम सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे एकट्याला बोलावले व अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हा देखील तिथे धावत गेला. तोवर इतर मारेकर्‍यांनी त्याच्यावर चॉपर व कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपींच्या हल्ल्यात आशिष संजय सोनवणे आणि गोकुळ बळीराम सोनवणे हे गंभीरित्या जखमी झाले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता अरुण सोनवणे याला मयत घोषित करण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची व मित्रपरिवाराची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली.



समता नगरात तणावाचे वातावरण
खुनानंतर समतानगर आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली. रामानंदनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !