सेवानिवृत्त पोलिस अधिकार्याचे एक लाख लंपास : अमळनेरातील घटना
One Lakh Lumpas of Retired Police Officer : Incident in Amalner अमळनेर : स्टेट बँकेत मुलांना पैसे पाठवण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकार्याकडील एक लाख रुपये लांबवण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी 11.30 ते 12 दरम्यान स्टेट बँकेच्या परीसरात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पिशवीला ब्लेड मारत लांबवली रक्कम
अर्जुन आत्माराम बोरसे (67, पांडुरंग रेसीडेन्सी, अमळनेर) हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असून त्यांना नुकतीच सेवानिवृत्तीची रक्कम मिळाल्याने त्यातून त्यांनी पत्नीसाठी दागिणे घेतले. मुलगा आणि मुलगी यांना पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी दागिने मोडले. एक लाख 45 हजारांची रक्कम घेवून सोमवारी सकाळी 11.30 वाता ते अमळनेरच्या स्टेट बँकेत आले. यावेळी सुरूवातीला त्यांनी मुलीच्या खात्यावर 45 हजार रुपये पाठवले मात्र याचवेळी पाळत ठेवून असलेल्या भामट्यांनी बोरसे यांच्याकडील पिशवीला ब्लेड मारले व त्यातून एक लाख रुपये लांबवले. काही वेळेनंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.


पोलिस अधिकार्यांची धाव
चोरीची माहिती कळताच पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेड कॉन्स्टेबल शरद पाटील, दीपक माळी, रवी पाटील, गणेश पाटील, नीलेश मोरे यांनी भेट देऊन बँक व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
