जळगावातील तरुणाचा खून ; दुसर्या आरोपीला नेपानगरातून अटक
जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : आरोपीला तीन दिवसांची कोठडी
Murder of youth in Jalgaon, another accused in handcuffs in Nepanagar जळगाव : जळगावच्या समता नगरातील अरुण बळीराम सोनवणे (28, रा.समता नगर जळगाव) या तरुणाचा समता नगराजवळील वंजारी टेकडीवर निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी सुरूवातीला
एलसीबीच्या पथकाने कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून अटक केली होती तर दुसर्या संशयिताला नेपानगरात जळगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशोक महादु राठोड (32, रा.झाकिर हुसैन कॉलनी, संत गाडगेबाबा चौक, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
वंजारी टेकडी, समता नगर भागातू खून करून पसार झालेला संशयित अशोक महादू राठोड हा नेपानगरात असल्याची एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. विशेष पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक हेमंत कळसकर, विजय जाधव आदींनी ही कारवाई केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


विवाह अमान्य : जुन्या वादातून तरुणाचा खून
रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील समता नगर परीसरातील वंजारी टेकडीवर वाद मिटवण्यासाठी अरुण सोनवणे व आशिष सोनवणे यांना बोलावण्यात आले होते. यावेळी संशयितांनी चॉपरने हल्ला केल्याने अरुण सोनवणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मित्र आशिश सोनवणे गंभीर जखमी झाला. भाऊ वंजारी टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर गोकुळ बळीराम सोनवणे हादेखील गेला मात्र त्याच्यावरही संशयितांनी हल्ला केल्याने तोदेखील जखमी झाला.
पाच संशयितांविरोधात गुन्हा
तरुणाच्या खून प्रकरणी गोकुळ बळीराम सोनवणे (31, समतानगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित सोनू आढाळे, पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि योद्धा उर्फ पिंट्या शिरसाठ अशा पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात खून व प्राणघातक हल्ला या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन संशयितांना अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा कसून शोध सुरू आहे. तपास सहा.पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.
