जळगावात तरुणावर दगडाने हल्ला : एकाविरोधात गुन्हा
जळगाव : मच्छी विक्रेत्याशी सुरू झालेला वाद सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा राग आल्याने चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत दगड डोक्यात टाकल्याने डिंगबर दिनकर सैंदाणे (25, रा.वाल्मिकनगर) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. रविवार, 10 रोजी रात्री 8.45 वाजता ही घटना वाल्मिकनगर परिसरात आसोदा रोडवर घडली होती. याप्रकरणी संशयित देवानंद शालीक सपकाळे (32, रा.आसोदा रोड, वाल्मिकनगर) याच्याविरुध्द तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात सोमवार 11 रोजी गुन्हा दाखल झाला.
भांडण सोडवण्याचा राग अनावर
डिंगबर सैंदाणे हा तरुण नाश्तागाडी लावून उदरनिर्वाह करतो. रविवारी रात्री तो मच्छि घेण्यासाठी आला. त्यावेळी मच्छि विक्रेता तसेच देवानंद सपकाळे यांच्यात वाद होवून भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न डिंगबर याने केला. याचा राग येवून देवानंद याने डिगंबर याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर डोक्यात दगड टाकून डिगंबर याला जखमी केले. तपास हवालदार रवींद्र बोदवडे करीत आहेत.


