जळगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Abuse of a minor girl in Jalgaon taluka जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना मंगळवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घडली. याप्रकरणी रात्री 9 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात योगेश तेजोमल पवार (जळगाव तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिशाभूल करीत बोलावून केला अत्याचार
जळगाव तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पीडीतेच्या घराशेजारील संशयित योगेश तेजमल पवार याने पीडीतेला आपल्या पत्नीने घराच्या मजल्यावर बोलावले असल्याचे खोटे सांगून दिशाभूल केली व पीडीता आरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेल्यानंतर संशयित आरोपी योगेश पवार याने पीडीतेवर अत्याचार केला.


पीडीतेने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार पीडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश पवार याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक ए.सी.ममोरे करीत आहे.
