जळगावात एमआयडीसीत गोदामाला आग : सुमारे 15 लाखांचे नुकसान


जळगाव : कचर्‍याची ठिणगी उडाल्याने जळगाव एमआयडीसीतील सेक्टर ए-97 येथील सोमनाथ इंटरप्रायजेसजवळील एका गोदामाला आग लागली. या आगीत कुट्टीच्या 200 गोण्यासह शेजारील मसाले, चिक्की व क्वाईल असे साहित्य जळाले1. ही आग रविवार, 11 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. तब्बत 13 बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ठिणगी पडल्याने लागली आग
जळगाव एमआयडीसी परीरातील सेक्टर ए-97 मध्ये असलेल्या सोमनाथ इंटरप्रायजेसजवळील एका गोदामामध्ये कुट्टी साठवून ठेवण्यात आली आहे. सोमवार, 11 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आजूबाजूला कोणीतरी कचरा पेटविला. काही वेळानंतर त्यातून एक ठिणगी गोदामातील कुट्टीवर उडाली. त्यामुळे कुट्टीने पेट घेतला व पाहता-पाहता ही आग शेजारी असलेल्या कंपनीतील मसाला, चिक्की गोदामाला लागली. त्यात या गोदामातील 15 ते 20 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या सोबतच त्यालाच लागून असलेल्या एमडी हिट किंग कंपनी या इंडस्ट्रीयल हिटर तयार करणार्‍या कंपनीमधील क्वाईल, लॅपटॉप, कपाट व इतर साहित्य जळून नुकसान झाले.



13 बंबांनी विझवली आग
आगीविषयी अग्नीशमन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर तेथे बंब पोहचले. पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र यासाठी एकामागे एक असे 13 बंबांद्वारे आग नियंत्रणात आणण्यात आली. याबाबत अद्याप पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !