चाळीसगावात सराफाचे लक्ष विचलित करीत महिलांनी लांबवले तीन लाखांचे दागिने


Distracting the attention of the goldsmith in Chalisgaon, the women stole jewelery worth three lakhs चाळीसगाव : दागिणे खरेदीसाठी सराफा दुकानात आलेल्या तीन महिलांनी सराफाचे लक्ष विचलित करीत तब्बल तीन लाखांचे दागिने लांबवल्याचा प्रकार शहरातील रथगल्लीतील राजरत्न ज्वेलर्समध्ये घडला. याप्रकरणी तीन महिलांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष विचलित करीत लांबवले दागिणे
चाळीसगाव शहरातील रथगल्लीत राजेंद्र रमेश वर्मा (42, चाळीसगाव) राजरत्न ज्वेलर्स नामक सराफा दुकान आहे. या दुकानात गुरुवार, 14 रोजी रोजी दुपारी अडीच वाजता तीन महिला दागिणे खरेदी करण्यासाठी आल्या. विविध दागिने पाहत असताना त्यांनी सराफा बांधवांचे लक्ष विचलित करीत तीन लाख 20 हजार रुपये किंमतीचे दागिने बॅगेसह लांबवले.



या बॅगेत सात ग्रॅमच्या कानातील रींगा, सहा ग्रॅमच्या मंगळसूत्र वाट्या, चार ग्रॅमचे सोन्याच्या धातूचे पँडल, 15 हजारांचे शिक्के व जोडवे तसेच 95 हजारांची रोकड होती. हा प्रकार लक्षात आल्याने वर्मा यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !