चोपडा सहाय्यक पोलिस अधीक्षकपदी अन्नपूर्णा सिंह


Annapurna Singh as Assistant Superintendent of Police Chopra जळगाव : चोपडा विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषीकेश रावले यांची पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर रीक्त जागी भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अन्नपूर्णा सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी भारतीय पोलिस सेवेतील दहा अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश शुक्रवारी काढले असून त्यात चोपडा विभागासाठी आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.



असे आहेत नवनियुक्त आयपीएस अधिकारी-

केज, जि.बीड- कमलेश मीना

पुलगाव, जि.वर्धा- राहुल लक्ष्मण चव्हाण

चोपडा, जि.जळगाव- अन्नपूर्णा सिंह

वरोरा, जि.चंद्रपूर- नवमी दशरथ साटम

अकोट, जि.अकोला- अनमोल मित्तल

चाकूर, जि.लातूर- चंद्रकांत रेड्डी बडेली,

मालेगाव छावणी- नाशिक ग्रामीण- सुरज भाऊसाहेब गुंजाळ

नांदेड शहर- अनिल रामदास म्हस्के

दारव्हा, जि.यवतमाळ- चिलुमुला रजनीकांत

अकलूज, सोलापूर ग्रामीण- किर्तीका सी.एम.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !