धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
A minor girl from Dharangaon taluka was lured and abducted धरणगाव : धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी रविवारी धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 16 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता दुकानावर जात असल्याचे अल्पवयीन मुलगी सांगून गेली. दरम्यान, ती घरी परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र मुलगी मिळाली नाही. त्यानंतर पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अज्ञात व्यक्तीने तिचा फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विठ्ठल पाटील करीत आहे.


