जळगावात बंद घराला टार्गेट करीत 32 हजारांचा ऐवज चोरला
32,000 was stolen by targeting a closed house in Jalgaon जळगाव : शहरात बंद घरे चोरट्यांना पर्वणी ठरत आहेत. जळगाव शहरातील वाटीकाश्रम परीसरातील महिलेचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि मोबाईलसह एकूण 32 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. जळगाव तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील खोटे नगराजवळील वाटीकाश्रम परीसरात शोभा प्रताप सोनवणे (40) ही महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 16 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता ते रविवार, 17 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा 32 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.


अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री साडेआठ वाजता जळगाव तालुका पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार दिनेश पाटील करीत आहेत.
