चाळीसगावातून आठ लाखांची महागडी इनोव्हा लंपास
Expensive Innova Lampas worth eight lakhs from Chalisgaon चाळीसगाव : शहरातील शाहू नगरातील गजानन महाराज मंदिराजवळून चोरट्यांनी आठ लाख रुपये किंमतीची महागडी इनोव्हा कार लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घराबाहेरून लांबवली कार
मुकेश बापूराव चौधरी (41, शाहू नगर, गजानन महाराज मंदिराजवळ, चाळीसगाव) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 17 ते 18 डिसेंबर दरम्यान चोरट्यांनी घराबाहेरून इनोव्हा कार (एम.एच.19 डी.ए.2777) लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही वाहनाचा तपास न लागल्याने पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.


