अयोध्यापर्यंत स्केटींगद्वारे प्रवास : भुसावळात तरुणाचे स्वागत
Journey to Ayodhya by Skating : Youth’s welcome in Bhusawal भुसावळ : गुजरातच्या आनंद येथील अगस्त घनश्यामभाई वाळंद हा तरुण रामसेतू राममंदिर अयोध्यापर्यंत स्केटिंगने तब्बल चार हजार पाचशे किलोमीटर प्रवास 80 दिवसात पूर्ण करणार आहे. या तरुणासोबत परिवारातील एकूण तीन सदस्य सोबत असून हा प्रवास प्रभू श्रीरामचंद्र यांचे चरण ज्या-ज्या ठिकाणी पडले त्या-त्या ठिकाणाहून सुरू असून तेथील मातीही तरुण सोबत घेत आहेत. भुसावळात या तरुणाचे स्वागत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
भुसावळा तरुणाचे स्वागत डॉ.विजय सोनी, हिंदू जागरण मंचाचे जिल्हासह संयोजक राहुल राणे, जिल्हा संपर्कप्रमुख शिशिर जावळे, अनुप अग्रवाल, पंकज चौक, योगेश गाडगीळ, चंद्रशेखर पाटील, अनिरुध्द कूलकर्णी, सिल्व्हर लाईन संचालक आशिष तिवारी यांच्यातर्फे करण्यात आले. हिंदू जागरण मंच, वसुंधरा परिवार गोसेवा परिवार, शिवभूमी मंडल, भाजपा युवा मोर्चा क्रिडा भारती कावड यात्रा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


