चोपडा तालुका खुनाने हादरला : धनवाडी शिवारात पत्नीची हत्या
संशयित पती चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात
Chopra taluka rocked by murder: Wife killed in Dhanwadi Shivar चोपडा : कौटूंबिक वादातून कुठल्यातरी धारदार हत्याराने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली. या घटनेत रेखाबाई दुरसिंग बारेला (44) यांचा खून झाला असून संशयित पती दुरसिंग बारेला (47 धनवाडी) यास चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेतातच केली हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, योगीराज पाटील यांच्या शेतात रेखाबाई बारेला यांची संशयित पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा कुठल्यातरी वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाला तर मुले आईच्या मृतदेहाजवळ बसून होती. मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांनी धाव घेतली.


24 तासात आरोपी जाळ्यात
चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी 24 तासात खुनाची उकल करीत आरोपीला अटक केली. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
