जळगावच्या सावता नगरात धाडसी घरफोडी : 68 हजारांचा मुद्देमाल लंपास
Bold house burglary in Savata Nagar, Jalgaon: 68,000 worth of valuables looted जळगाव : कुलूपबंद घराचा कडीकोयंडा तसेच कुलुप तोडून चोरट्यांनी प्रवेश करीत लोखंडी कपाटातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड मिळून सुमारे 68 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. आव्हाणे शिवारात पंचवटी कॉलनी सावतानगर याठिकाणी ही घरफोडी सोमवार, 18 रोजी सकाळी उघडकीस आली.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
रत्नाबाई संदीप पाटील (35) या संत सावतानगर येथे वास्तव्यास आहेत. रविवार, 17 रोजी सकाळी 9 वाजता घराच्या दरवाजाला कुलुप लावून त्या राजनगर येथे वडील लोटन अंबादास देवेरे यांना भेटण्यासाठी गेल्या. सोमवारी सकाळी 7 वाजता त्या घरी आल्या असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तसेच कुलुप तुटलेले दिसले.


बेडरुममधील लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसला. लॉकरमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने तसेच रोकड असा 68 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. घटना कळताच पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत, पोनि महेश शर्मा यांच्यासह तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून पाहणी करुन माहिती घेतली. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार रामकृष्ण इंगळे करत आहेत.
