उसनवारीचा वाद उफाळला : काचेचा ग्लास मारुन केली दुखापत


जळगाव : उसनवार पैसे घेतल्याच्या कारणावरुन काचेचा ग्लास मारुन एकास दुखापत केल्याची घटना शहरात सिंधी कॉलनीत सोमवार, 18 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

कमलेश बुधलदास चिमणाणी (38) हे सिंधीकॉलनी बाबानगर येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी ते सिंधी कॉलनीत त्यांच्या चहाचे दुकानावर होते. लकी अशोककुमार बुलाणी (रा.बाबानगर) आला. पैश्यांच्या कारणावरुन काचेचा ग्लास कमेलेश यांच्या डाव्या कानावर मारुन शिवीगाळ केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !